अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकास भर रस्त्यात बेदम मारहाण
पोलीस महानगर नेटवर्क
माजलगाव – बीडच्या माजलगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला बेदम व कपडे फाटेस्तोवर मारहाण करण्यात आली होती. भर चौकात अमानुष मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांकडून या मारहाण प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मराठा आंदोलन दरम्यान जाळपोळीच्या घटनेत माझे नाव या जाळपोळीत विनाकारण का गोवले? माझ्यावर गुन्हा दाखल करतो का? मी जाळपोळीत होतो तरी का?’ असे म्हणत सलूनमध्ये दाढी करताना भर रस्त्यावर आणून कपडे फाटेस्तोवर बेदम मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.