धक्कादायक ! अल्पवायीन मुलीवर कॅब चालकाकडून अत्याचार
सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल़ नंबर ट्रेस करून दादर पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला केले जेरबंद
योगेश पांडे – वार्ताहर
मुंबई – मुंबईतील दादर परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका कॅब (टैक्सी) चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणांतील आरोपीला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुंटुबिय त्याच्या मूळ गावी कामानिमित्त गेल्याने ती त्यांच्या शेजाऱ्याकडे काही दिवस थांबली होती, मात्र गुरुवारी साधारण २ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी कोणाला काही न सांगता एकटीच घराबाहेर पडली. मुलगी ज्या शेजाऱ्यांकडे काही दिवस वास्तव्यास होती ते त्यांचे नातेवाईक असल्याने मुलीच्या आईने तिला त्यांच्याकडे राहण्यास सांगितले होते. मात्र गुरुवारी मुलगी कोणाला काही न सागंता बाहेर पडली असता तिला एकटे पाहून कॅब चालकाने तिला बोलण्याच्या नादात तिला तेथून घेऊन गेला, अशी माहिती दादर पोलिसांनी दिली.
मोहम्मद जलील खलील असे आरोपी कॅब चालकाचे नाव आहे. मोहम्मदने तिला बोलण्यात गुडंळले आणि मुंबई दर्शन दाखवून देऊ या बहाण्याने तिला कॅबमध्ये बसवले.त्यानंतर मोहम्मदने कॅब मध्ये बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीने या घटनेनंतर घरी पोहचल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तक्रार नोंद केल्यानंतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच या आरोपीचा मोबाईल़ नंबर ट्रेस करून त्याला पकडण्यास यश आलं आहे आणि त्यांनी आरोपीला वडाळा येथून अटक करण्यात आली.
आरोपी कॅब चालकावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी आरोपीने तरुणीला त्याचा मोबाईल नंबर एका कागदावर लिहून दिला होता. मोहम्मदला वाटले मुलगी त्याला परत त्याला कॉल करेल. मात्र मोबाईल नंबर मिळाल्याने आरोपीचा तपास लवकर लागण्यात मदत झाली असे पोलिसांनी सांगितले.