साडे २१ लाखांचे मोबाईल पोलिसांकडून हस्तगत; मुळ मालकांना केले हस्तांतरीत
विवेक मौर्य
ठाणे – ठाणे पोलिसांनी हरवलेले तब्बल साडे २१ लाखांचे मोबाईल फोन शोधुन मुळ मालकांना परत केले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत विविध क्षेत्रात हरवलेले, गहाळ झालेले रिक्षात विसरलेले ५० मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकांना खात्री पटवुन परत करण्याची कार्यवाही खंडणी विरोधी पथकाने केली आहे. या मोबाइलचा छडा लावण्यास https://ceir.gov.in हया संकेतस्थळाने मोलाची भूमिका बजावली आहे. तेव्हा जर तुमचा मोबाइल गहाळ झाला असल्यास लगेच या संकेतस्थळावर आपल्या मोबाइलची माहिती पाठवावी.असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी केले आहे.