विश्वासू नोकराने केला मालकांचा विश्वासघात आणि करोडो रुपयांची चोरी
विवेक मौर्य
ठाणे – ठाण्यातील राजवंत ज्वेलर्स मधील सेल्समॅन नी दुकानातील सोन्यांच्या दुकानातून कोरोडो रुपयांचे हार, सोनसाखळी, कानातले आणि सोनं च्या वस्तू चोरल्याची घटना ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. राजवंत ज्वेलर्स मधील सेल्स मॅन राहुल जयंतीलाल मेहता ह्याने हि चोरी केल्याच निष्पन्न झाले. राहुल हा राजंवत ज्वेलर्स च्या दुकानात तार वर्ष सेल्स मॅन म्हणुन काम करत होता. त्याच्यावर दुकानातील दागिने मोजण्याची जबाबदारी दिली होती.गेल्या तीन महिन्यापासून राहुल हा दुकानातील एक एक करुन दागिन्याची चोरी करत होता परंतु मालकाल हिशोबात मोजमापणी केलेल्या दागिन्यांचे हिशोब बरोबर सांगून दागिने चोरत होता. तीन महिन्यात राहुल ने राजवंत ज्वेलर्स मधून १ कोटी ५ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरले.आणि राहुल हा गुजरात आणि गुजरात वरुन इंदौर ला फरार झाला. २६ मार्च ला राहुल हा त्यांच्या मैत्रिणी ला भेटण्यासाठी मिरा रोड या ठिकाणी येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली. आणि नौपाडा पोलिसांच्या टीम ने सापळा रचून राहुल ला अटक केली.
ठाणे पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया ढाकणे, नौपाडा वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, शरद कुंभार, मंगेश भांगे, संगम पाटील, दत्तात्रय लोंढे यांच्या टीम ने हि कारवाई यशस्वी रित्या पुर्ण केली.