पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाचा आढळला मृतदेह; परिसरात उडाली खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : शहरातरील अति उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ‘कोरेगाव पार्क’ भागात असलेल्या एका ‘स्पा’ सेंटरच्या दारातच पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळूनह आल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. ७ मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणाची खबर मिळताच पुणे शहर नियंत्रण कक्षाला आज सकाळी साडेदहा ते आकरा च्या सुमारास माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची दाखल घेण्यात आली.
दत्तात्रय कुरळे असे मृतदेह आढळून आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पोलिसांच्या एमटी विभागात कार्यरत होते. पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात भरती झाले होते. नुकतेच दत्तात्रय कुरळे हे पदोन्नतीने पोलिस उपनिरीक्षक झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.