मंत्रालयात बनावट कागदपत्रं घोटाळा ; तत्कालीन उपसचिव दोषी,पोलिसांत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मंत्रालयात नवा बनावट कागदपत्र स्कॅम उघड झाला आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणात मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तत्कालीन गृहविभागाचे उपसचिव किशोर भालेराव यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
तत्कालीन गृहविभाग उपसचिव किशोर भालेराव यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्र तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक संवेनशील गुन्ह्यात, विशेष सरकारी वकील म्हणून बनावट कागदपत्रांद्वारे वकीलांची नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय गोपनीय चौकशी करण्यात आली. त्यात तात्कालीन उपसचिव किशोर भालेराव हे स्वतः दोषी आढळून आले आहेत. त्यांच्याबरोबरच विशेष सरकारी वकील शेखर जगताप, श्यामसुंदर आणि शरद अग्रवाल हे देखील दोषी आढळले आहेत. त्यांचादेखील आरोपींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अनेक संबंधित गुन्ह्यात विशेष सरकारी वकील म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे वकिलांची नियुक्ती केल्याची माहिती यामध्ये समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.