नाशिकमधील आयकर विभागाच्या धाडीत सापडले ८५० कोटींचे घबाड

Spread the love

नाशिकमधील आयकर विभागाच्या धाडीत सापडले ८५० कोटींचे घबाड

प्रकाश संकपाळ

नाशिक – नाशिक मधील बांधकाम व्यवसायिक व सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली आहे. या धाडीत कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. मागील आठवड्यापासून हे धाडसत्र सलग ५ दिवस चालू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील आयकर विभागाच्या धाडीत अधिकाऱ्यांना मोठे घबाड सापडले आहे. नाशिकच्या कंत्राटदारांचे जवळपास ८५० कोटींचे बेहिशेबी व्यवहार या धाडीत उघड झाले आहेत. आयकर विभागाच्या सलग पाच दिवस चाललेल्या धाडसत्रात ८ कोटींची रोकड व ३ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या पथकाकडून शहरातील आठ शासकीय कंत्राटदारांची कार्यलये आणि निवासस्थानावर हे धाडसत्र सुरू होते. दरम्यान राजकीय पक्षाशी संबंधित काही व्यक्तींच्या देखील या कंत्राटदारांकडे गुंतवणूक केल्याची कागदपत्रे आयकर विभागाला सापडली आहेत. या कारवाईनंतर कोणता राजकीय नेता आयकर विभागाच्या रडारवर येतो या बाबत चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon