डोंबिवली पूर्व परिसरातून २ तलवारीसह एकास कल्याण गुन्हे शाखेकडून अटक
डोंबिवली – मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना इंद्रप्रस्थ बार सोनारपाडा रिक्षा स्टॅण्ड च्या समोर एक इसम तलवार घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन तपास केला असता त्या इसमास ताब्यात घेण्यात आले.त्याच्याकडून २ तलवारी व तलवारीची असा एकूण २०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाने नाव अक्षय पवार असून त्यास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनुप कामत,दत्ताराम भोसले,बालाजी शिंदे,विश्वास माने,गोरखनाथ पोटे आणि त्यांच्या पथकाने केली.