कल्याणमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणाऱ्या इसमास अटक

कल्याणमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणाऱ्या इसमास अटक

प्रकाश संकपाळ

कल्याण – रामबाग परिसरात रस्त्यावर रात्री पायी चालत असताना एक इसम महिलेचा पाठलाग करीत असताना संधी साधून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पाठीमागून गळ्यावर हात मारून चोरून पळत असताना महिलेने आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिक व गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव पुरूषोत्तम चखोरीया असे असून त्याच्यावर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजून त्याच्यावर अजून कोणते गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी सुरू असून आरोपीकडून एक तोळ्याचे मंगळसूत्र हस्तगत केले असल्याची माहीती महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दैनिक ‘पोलीस महानगर’शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon