चोरी करण्यासाठी मुलाला आईच पुरवायची ड्रग्स; आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडीचे २२ हून अधिक गुन्हे दाखल, आरोपीची आई फरार

Spread the love

चोरी करण्यासाठी मुलाला आईच पुरवायची ड्रग्स; आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात चोरी व घरफोडीचे २२ हून अधिक गुन्हे दाखल, आरोपीची आई फरार

योगेश पांडे / वर्ताहर 

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारंवार चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली. मात्र त्याच्या चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीने एकच खळबळ माजली आहे. सतत चोरी करणाऱ्या त्या आरोपीला त्याची आईच हे गुन्हे करायला लावायची आणि त्यासाठी तीच त्याला ड्रग्सही द्यायची असे पोलीस तपासात समोर आले आहे. यानंतर तो नशेत गुन्हे करत असे. आरोपीचे नाव कृष्णा म्हैसकर – २४ असे आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे २२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांसमोर हे धक्कादायक सत्य समोर आलं. म्हैसकर हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या सर्व गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याची आई विजेता म्हैसकर – ५० हिची महत्त्वाची भूमिका होती. चोरीपूर्वी ती त्याला अमली पदार्थ द्यायची. त्यानंतर त्याने चोरी केलेलं सामान आणि पैसे ती स्वतःकडेच ठेवायची, असे काळाचौकी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि त्याची आई हे दोघेही काळाचौकी भागातील रहिवासी होते. पोलिसांनी आरोपी कृष्णा रवी म्हैसकर याला आग्रीपाडा परिसरातून अटक केली, तर त्याची आई अद्यापही फरार आहे. तिला पकडण्यासाठी पोलीसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon