थरारक ! पायाला गोळी लागून देखील जेष्ठ नागरिक वाघासारखा भिडला; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Spread the love

थरारक ! पायाला गोळी लागून देखील जेष्ठ नागरिक वाघासारखा भिडला; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

पोलीस महानगर नेटवर्क

नांदेड – बँकेतून परत येत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला बंदुकीच्या धाकावर लुटल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. नांदेड शहरातील अष्टविनायक नगर येथे एका ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार करून लुटलं आहे. याच भागात राहणारे रवींद्र जोशी बँकेतून ४० हजार रुपये घेऊन घरी जात होते, त्याचवेळी गेट जवळ त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. बाईकवरून आलेल्या या दोघांनी रवींद्र जोशी यांच्याकडे असलेल्या पैशांची पिशवी खेचायला सुरूवात केली. पैसे लुटताना रवींद्र जोशींनी प्रतिकार केला, यावेळी त्यांच्यात आणि आरोपींमध्ये झटापट झाली. यात रवींद्र जोशी यांच्या हाताल एक आणि पायाला एक गोळी लागली.

गोळीबार करुन पैसे लुटणारे दोघे शहराजवळच्या असर्जन भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांची पथकं त्या ठिकाणी पोहचली. पोलिसांना पाहून दोन्ही आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. तेव्हा एका आरोपीने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी देखील प्रतिउत्तरात गोळीबार केला. एक गोळी एका आरोपीच्या पायाला लागली. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. हरदीप सिंघ धिल्लोन हा आरोपी नांदेड शहरातील रहिवाशी असुन रोहीत कौडा आणि सरप्रीत सिंघ सतोहा हे दोघे पंजाब राज्यातील रहिवाशी आहेत. आरोपीकडून लुटलेले चाळीस हजार रूपये, एक पिस्टल, दोन दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जखमी आरोपीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तीनही आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon