महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास रत्नागिरी येथून केले जेरबंद

Spread the love

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास रत्नागिरी येथून केले जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – पायी चालत असलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध रबाळे पो.स्टे. गु.र. नं. १५७/२०२४ भा.दं.वि. ३९४ अंतर्गत दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष – १ कडून करण्यात येत होता. सदर गुन्ह्यामध्ये दि. २३/०३/२०२४ रोजी सकाळी ९:३० वा. च्या सुमारास एका ६५ वर्षाच्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात आरोपीने पायी चालत जाऊन जबरीने खेचून घेऊन पळून गेला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासावरून वरून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल प्रकाश घोरपडे वय -(३६), वर्ष रा. चिपळूण, जि. रत्नागिरी हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सपोनि निलेश पाटील व पोलीस हवालदार अतिश कदम, पोलीस शिपाई सावरकर यांचे पथक चिपळूण येथे पाठवून विलास घोरपडे यास तपासकामी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून तपासात धक्कादायक माहीती मिळाली.त्याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १५७/२०२४ भादंवि ३९४, कळवा ८७८/२०२४ भादंवि ३९३, कळवा ११६/२०२०, भादवी, ३९२, सांताक्रूझ पोलीस १३३/२०१४, भादवी, ३८०, चिपळूण ३०/२०१२, भादवी, ३९२, चिपळूण १५७/२०१२, भादवी, ३९२, चिपळूण १५८/२०१२, भादवी, ३८०, चिपळूण ०२/२०१७, भादवी, ३८०, सावर्डे ०६/२०१४, भादवी, ३९५, सावर्डे ६१/२०१४, भादवी, ३९५, खेड २४२/२०१४, भादवी, ३९५, खेड २४३/२०१४, भादवी, ३९५ आदि गुन्हे दाखल असून सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी रबाळे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे गुन्हे शाखा कक्ष – १ चे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon