डहाणू गरीब नवाज एज्युकेशन ट्रस्ट व पालघर जिल्हा पोलीस दल जनसंवाद अभियाना अंतर्गत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप

Spread the love

डहाणू गरीब नवाज एज्युकेशन ट्रस्ट व पालघर जिल्हा पोलीस दल जनसंवाद अभियाना अंतर्गत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप

पालघर / विजय घरत

पालघर – जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर जिल्हा पोलीस दल यांच्या अंतर्गत संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनसंवाद अभियान राबवले होते. या जनसंवाद अभियानाचा बक्षीस समारंभ सोमवार दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डहाणू येथील गरीब नवाज एज्युकेशन ट्रस्ट यांच्यासह सातपाटी, चिंचणी, मोखाडा येथील मुस्लिम बांधवांच्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्कृष्ट ईद-ए-मिलाद २०२३ सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संपूर्ण पालघर जिल्ह्यात पालघर पोलीस दल यांच्या वतीने जनसंवाद अभियान राबवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाला प्रतिसाद देत पालघर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी २८ सप्टेंबर २०२३ रोजी ईद-ए-मिलाद हा उत्सव सामाजिक बांधिलकी जपून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि शांततेमय वातावरणात पार पाडला होता. गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच ३८ सप्टेंबर २०२३ रोजीचा ईद-ए मिलाद हा उत्सव पालघर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढून कायद्याची अंमल बजावणी करत शांततेत व मोठ्या उत्साहात पार पाडला होता. या जिल्ह्याच्या उत्सवामध्ये विशेष करून डहाणू आशागड येथील गरीब नवाज एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकर्ते अब्दुल इब्राहिम खान, महफुज अन्सारी, अफसर खाटीक, अब्दुल रहीम शेख यांनी डहाणू आशागड येथे प्रबोधनात्मक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून हा उत्सव शांततेत साजरा केला होता. या उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी आशागड गरीब नवाज एज्युकेशन ट्रस्ट सह सातपाटी, चिंचणी, मोखाडा येथील मुस्लिम मंडळांना पालघर जिल्हा पोलीस दल जनसंवाद अभियान अंतर्गत बक्षीस समारंभाच्या वेळी पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दि.२९ जानेवारी २०२४ रोजी पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयात उत्कृष्ट ईद-ए-मिलाद २०२३ म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम व गरीब नवाज एज्युकेशन ट्रस्टच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon