जळगावातील शेतकऱ्याची लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक; अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

जळगावातील शेतकऱ्याची लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक; अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव – राज्यात विवीध प्रकारे ऑनलाईन फसवणूक जोरात सुरू आहे. तरीसुद्धा नागरिक ऑनलाईन आमिषाला बळी पडून स्वताचे आर्थिक नुकसान करून घेतात, अशीच एक घटना जळगावमध्ये घडली आहे. पॉलिसीवर आर्थिक फायदा झाल्याचे बनावट धनादेशद्वारे दाखवीत शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सन २०१० ते २०२४ पर्यंत वेळोवेळी शेतकऱ्याकडून ऑनलाइन पैसे स्वीकारून त्यांची २३ लाख ४७ हजारात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे संजय त्र्यंबक कुलकर्णी (वय ७१) हे वृद्ध वास्तव्यास असून ते शेती करतात. त्यांच्यासोबत विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून त्यांनी काढलेल्या पॉलिसींवर आर्थिक फायदा झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच त्यांच्या व्हॉट्सअँपवर ते धनादेश पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्याचप्रमाणे सन २०१० ते २०२४ पर्यंत चौदा वर्षांत संजय कुलकर्णी यांना आर्थिक फायदा होत असल्याचे भासवून त्यांच्याकडून वेळोवळी बँक खात्यावर तब्बल २३ लाख ४७ हजार ऑनलाइन पैसे स्वीकारले. कुलकर्णी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon