पुणे विमानतळावर साडेतीन कोटींच्या सोन्याची तस्करी; महिलेसह दोघांना अटक

Spread the love

पुणे विमानतळावर साडेतीन कोटींच्या सोन्याची तस्करी; महिलेसह दोघांना अटक

पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले ६ किलो ९१२  ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) जप्त केले. सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली.पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला येणार असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने विमानतळावर सापळा लावला. विमानतळावर महिला साथीदारासह उतरली.गडबडीत महिला आणि तिच्याबरोबर असलेला साथीदार विमानतळातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात होते. डीआरआयच्या पथकाने दोघांची संशयावरुन चौकशी सुरू केली. त्यांची तपासणी करण्यात आली.६ किलो ९१२ सोन्याची भुकटी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. दोघांकडून सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली.

याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय सीमाशुल्क कायद्यान्वये (कस्टम ॲक्ट) गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांची न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. चार दिवसांपूर्वी कस्टमच्या पथकाने पुणेआंतराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ७३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon