हिंजवडीत आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

Spread the love

हिंजवडीत आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

प्रकाश संकपाळ

पुणे – हिंजवडी परिसरात एका हॉटेलमध्ये आयटीआय अभियंता महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे.वंदना द्विवेदी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ निगम याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वंदना आणि ऋषभ हे दोघेही लखनऊ येथील आहेत. ते हिंजवडी आयटी पार्क मध्ये नोकरीस होते. मागील दोन दिवसांपासून दोघेही हिंजवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये राहत होते. दरम्यान ऋषभ याने वंदना यांचा रविवारी पहाटेच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला.खून केल्यानंतर ऋषभ मुंबईच्या दिशेने जात होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये तो पिस्तुलासह आढळला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली. हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

*पुणे व हिंजवडीत नक्की चाललंय काय?*

काही दिवसांपूर्वी हिंजवडीत पत्नीच्या प्रियकराची माहिती मिळाल्यावर पतीने प्रियकराची चाकुच्या साह्याने वार करत हत्या केल्याचा प्रकार पुण्यातील हिंजवडी येथे उघडकीस आला होता. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.  मृत व्यक्ती बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेत असतांना या प्रकरणाचा उलगडा झाला.पत्नीसोबत किशोरचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला होता. यामुळे त्याने त्याला जीवे मारण्याचा कट रचला. किशोरला दुचाकीवरून सूसगाव येथून वारक गावात मुळशी धरणाच्या बाजूला नेले. या ठिकाणी त्याने लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबला. यावेळी सोबत आणलेल्या चाकूने किशोरच्या मानेवर, चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला होता. यानंतर त्यानंतर किशोरचे हात-पाय बांधून त्याचा मृतदेह मुळशी धरणाच्या पाण्यात फेकून दिला होता.यापूर्वी आयटी क्षेत्रात अशाच घटना सातत्याने घडत असल्यामुळे नेमकं पुणे आयटी क्षेत्रात चाललय काय असच म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon