मोक्का गुन्ह्यात सहभागी असलेल्या ३ आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात यश 

Spread the love

मोक्का गुन्ह्यात सहभागी असलेल्या ३ आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात यश 

पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांच्या पथकाची कारवाई

विजय घरत / पालघर

पालघर – पालघर जिल्ह्यात दरोडे, घरफोडी, चोरी अशा गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या आणि २०१७ मध्ये मोक्का गुन्ह्यामध्ये समाविष्ट झालेल्या मुंबईतील एका सराईत गुन्हेगारांच्या टोळी पैकी ३ आरोपींना जेरबंद करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या पथकाला यश आले आहे. हे गुन्हे करताना पोलिसांना माहिती व पुरावे मिळू नये याची खबरदारी घेणारी तसेच चोरी केल्यानंतर वाहनाचा नंबर प्लेटची अदला-बदली करणारी ही टोळी पालघर पोलिसांनी बोईसर परिसरात जेरबंद केली आहे. या टोळीच्या ४ सदस्यांपैकी तिघांना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे.

बोईसर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत असताना एका वाहनाची नंबर प्लेट काढताना काही इसम दिसून आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर संशय बळवल्याने वाहनाची झाडझडची घेतली असता वाहनामध्ये बनावट नंबर प्लेट व नंबर प्लेट तयार करण्यासाठी लागणारी रेडियम ची अक्षरे, क्रमांक व इतर सामुग्री त्याचबरोबर चोरी करण्याच्या दृष्टीने वॉकी टॉकी, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी कटावणी, चाकू, कटर इत्यादी साहित्य सापडले. अंजन महंती वय वर्ष (५१) टागोर नगर विक्रोळी, श्रावण हेगडे वय वर्ष (४५) गोवंडी व सरोज अन्सारी वय वर्ष (२६) राहणार गोवंडी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

या संदर्भात तपास केल्यानंतर तारापूर, बोईसर यांच्यासह मुंबई, पुणे परिसरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या ४० पेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये या पैकी एका गुन्हेगाराचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच जुईनगर नवी मुंबई येथे बँक ऑफ बरोडा येथे लगतच्या गळ्यामधून भुयारी मार्ग करून बँक ऑफ बरोडा येथे केलेल्या साडेतीन कोटीच्या चोरी मध्ये यापैकी काहींचा समावेश आहे. सहा गुन्ह्या मध्ये या आरोपांनी आपल्या सहभाग कबूल केला असून या चोऱ्यामधील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सन २०१७ मध्ये या टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान तुरुंगात असताना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञाना विषयी अधिक माहिती घेऊन चोरी करण्यासाठी वॉकी टॉकी चा वापर करत असल्याचे उघडकीस आले आहे. बोईसर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे मोठी घटना घडण्यापासून बचावल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. चोरी करण्यापूर्वी मोबाईल व इतर तांत्रिक तपासात वापरण्यात येणारे धागेद्वारे उपलब्ध नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल विभूते व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्ह्यातील आरोपी संदर्भातील पुढील तपास करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon