नेरळमध्ये १० लाखांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या; नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

नेरळमध्ये १० लाखांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या; नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रकाश संकपाळ

नेरळ – कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथील एका घराची कडी उचकटून जवळपास रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा १० लाख रुपये किमतीचा ऐवज लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत महेंद्र दुबे यांनी नेरळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, महेंद्र दुबे कुटुंबीय हे नेरळ खांडा येथील वस्तीत वास्तव्यास आहेत. त्यांच्या निवासाचे दुरुस्तीचे काम चालू असल्याने त्यांनी जवळच राहणारे अविनाश राठोड यांच्या जवळील रिकाम्या घरात सर्व साहित्य ठेवण्यात आले. त्यांच्या याच घरातून दरवाजाची कडी उचकटून सोने,चांदी व रोख ग्रॅम रोख रक्कम असा १० लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर दुबे यांनी नेरळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.या प्रकरणी नेरळ पोलिसांनी भादंवि कलम ४५४ व ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी अविनाश राठोड यास ताब्यात घेऊन त्याची कसून केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले असे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon