कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाची पोलिसांसोबत हुज्जत, शिवीगाळ ; एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाची पोलिसांसोबत हुज्जत, शिवीगाळ ; एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कल्याण – परीसरात वाहने चालविताना नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणे जरूरी असताना तसेच आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, मात्र काही तरुण दुचाकी व चारचाकी वाहन चालक वाहतूक नियम पायदळी तुडवून आपली वाहने सुसाट चालवत असतात परिणामी अपघात होण्याची जास्त शक्यता असते.

वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियमन करताना कुठेही वाहतूक खोळंबा होऊ नये यासाठी रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य पार पाडत असतात, मात्र असं असताना देखील पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशीच एक घटना छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी घडली आहे. एक तरुण आपल्या दुचाकीवरून ट्रिपल सीट घेऊन वाहन चालवत होता, याबाबत कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनी त्याला विचारणा केली असता तो दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे त्याच्या अल्कोहोल चाचणीवरून लक्षात आले, याबाबत कारवाई करण्याची तयारी असताना त्या तरुणांच्या बाजूने अनेक महिला पुढे येऊन उलट पोलिसांनाच शिवीगाळ करत होत्या.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या त्या तरुणावर वाहतूक पोलीस अधिकारी बडगुजर यांनी त्या तरुणावर मोटर वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत १८९ नुसार कारवाई केली तसेच तेथील उपस्थित महिलांनी पोलिसांशी हुज्जत व शिवीगाळ केली म्हणून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात त्या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी दैनिक ‘पोलीस महानगर’ शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon