संसदेत घूसखोरीच्या मुद्दयावरून आक्रामक झालेल्या आणखी ४९ खासदारांचं निलंबन ; एकूण १४१ विरोधी खासदार निलंबित

Spread the love

संसदेत घूसखोरीच्या मुद्दयावरून आक्रामक झालेल्या आणखी ४९ खासदारांचं निलंबन ; एकूण १४१ विरोधी खासदार निलंबित

राज्यातील अमोल कोल्हे सुप्रिया सुळे यांचंही निलंबन

योगेश पांडे / वार्ताहर

नवी दिल्ली – संसदेत घूसखोरीच्या मुद्दयावरून सरकार विरोधात आक्रामक झालेल्या आणखी ४९ खासदारांचं मंगळवारी निलंबन करणयांत आलं असून निलंबित खासदारांचा एकूण आकडा तब्बल १४१ वर पोहोचला आहे. लोकसभेतून मंगळवारी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या दोन खासदारांचाही समावेश आहे. निलंबनाची कार्यवाई झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. शेतकऱ्यांच्या भाजीचा देठालाही हात लावू नका, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या प्रशासनाला ताकीद होती. मात्र छत्रपतींच्या नावाने मत घेऊन सत्तेत आलेले हुकूमशहा मात्र शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाच नव्हे तर शेतकऱ्याच्या जीवालाच हात घालायला निघालेत कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, यासाठी संसदेत चर्चा करण्याची मांगणी आम्ही करत होतो म्हणून हुकूशाही पद्धतीने आमचं निलंबन करण्यात आलं, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी आपला संताप व्यक्त केला. तसंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमितील मावळे आहोत, संघर्ष हा आमच्या रक्तात आहे. प्रसंगी आम्ही रस्त्याचं रणांगण करू, पण शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत प्राणपणाने लढू. हाच निर्णय करत कांदा निर्यातबंदीच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सहकारी पक्षांच्या खासदारांसोबत संसद परिसरात आंदोलन केले, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.

लोकसभेतून अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेले सदस्य आहोत. मात्र सध्या सरकार कडून दडपशाही शुरु आहे, त्यामुळे १०० हून अधिक खासदारांचा निलंबन करण्यात आलं आहे, पण आम्ही काय मागतोय? आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की, संसदेत जी घुसखोरी झाली त्याबद्दलच सत्य समोर यावं. त्यावर चर्चा झाली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेवर सरकारतर्फे म्हणणं मांडलं पाहिजे. भाजप खासदाराच्या पासवर आत आलेली दोन मुलं संसदेत घुसली, त्यावर चर्चा व्हायला नको? ही दडपशाही आहे असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon