ताज आणि ट्रायडेंट हॉटेलमध्ये दहशतवादी हल्याचा धमकीचा फोन; मुंबई पोलीस हायअलर्ट मोडवर

ताज आणि ट्रायडेंट हॉटेलमध्ये दहशतवादी हल्याचा धमकीचा फोन; मुंबई पोलीस हायअलर्ट मोडवर

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलमध्ये धमकीचा फोन कॉल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीचे तपासणी केली. मुंबईतून हा फेक कॉल करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलमध्ये फोन करून धमकी दिली. अज्ञात कॉलरने फोन करून या दोन्ही हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी दिली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ सतर्क झाली. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमध्ये जाऊन तपासणी केली. परिसरातही पाहणी केली. फोन कुठून आला आणि कुणी केला याचा तपास सुरू करण्यात आला.

ताज आणि ट्रायडेंट हॉटेल सारख्या हॉटेलमध्ये धमकीचा फोन करण्यात आल्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली.पोलिसांनी तातडीने हा कॉल कुठून आला होता, याचा शोध घेतला. तपासामध्ये पोलिसांनी कॉल ट्रेस करून सायन परिसर लोकेशन सापडलं. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सायन परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सायन परिसरात राहणाऱ्या एका इसमानेच हा धमकीचा फोन का केला असल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतलं आहे, त्याने हा फोन का आणि कशासाठी केला. यामागील कारणांचा तपास सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा फोन कॉल फक्त खोटाळपणा असल्याचं समोर आले आहे. पण, ताज सारख्या हॉटेलमध्ये फोन करून असं कृत्य केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या इसमाची कसून चौकशी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon