मुरबाडमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून शिक्षिकेच्या घरात चोरीचा प्रयत्न; शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला

मुरबाडमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलाकडून शिक्षिकेच्या घरात चोरीचा प्रयत्न; शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – मुरबाड तालुक्यातील शिवळे या गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अवघ्या १३ वर्षांच्या एका मुलाने शिक्षिकेच्या घरात घुसून एक नको तो प्रकार केलेला आहे. या घटनेने संपू्र्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा हा शिक्षिका सायली यांच्या घरात शिरला होता आणि घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत घरातील कपाट उघडण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र त्या वेळी सायली या घरात आला आणि त्याला त्यांनी थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आपण अचानक पकडल्याने मुलगा हा घाबरला आणि त्याने संतापाच्या भरात स्वत:कडे असलेल्या धारदार वस्तूने सायली यांच्यावर जोरदार वार केला.

मुलाच्या हल्ल्यात सायली या गंभीर जखमी झाल्या. याच दरम्यान हल्ला केल्यानंतर आरोपी मुलाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.सायली यांनी नागरिकांनी तातडीने जवळील एका खाजी रुग्णालयात दाखल केल असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या घटनेने शिवळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. पण आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रत्येक स्थानिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon