चोरीची फॉर्च्यूनर अवघ्या ८ तासांत जप्त; चार आरोपींना अटक

चोरीची फॉर्च्यूनर अवघ्या ८ तासांत जप्त; चार आरोपींना अटक

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चोरीस गेलेली फॉर्च्यूनर कार अवघ्या आठ तासांत शोधून काढत चार आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले असून, या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक होत आहे.

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६०/२०२६ अंतर्गत फॉर्च्यूनर वाहन चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास रहाणे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. अवघ्या आठ तासांत चोरीस गेलेली फॉर्च्यूनर हस्तगत करण्यात आली.

या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी आरोपींकडून अधिक चौकशी सुरू केली असून, या टोळीचा इतर वाहनचोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाच्या तत्परतेचे कौतुक करत अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon