बेला (भंडारा) येथे वेशाव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
भंडारा : भंडारा शहरालगतच्या बेला परिसरात सुरू असलेल्या वेशाव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) ही धडक कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान काही महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात हे रॅकेट काही दिवसांपासून सक्रिय असल्याचे समोर आले आहे. आरोपी महिलांना पैशाचे आमिष दाखवून किंवा दबाव टाकून या व्यवसायात ढकलत असल्याची माहितीही पुढे आली आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.