कल्याणातील ‘वाधवा मेडोज’मध्ये भटक्या कुत्र्यांवरून तणाव; हल्ल्यांत ८० जण जखमी, दोन्ही बाजूंवर गुन्हे

Spread the love

कल्याणातील ‘वाधवा मेडोज’मध्ये भटक्या कुत्र्यांवरून तणाव; हल्ल्यांत ८० जण जखमी, दोन्ही बाजूंवर गुन्हे

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : वाधवा मेडोज या उच्चभ्रू सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत सुमारे ८० रहिवासी जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोसायटीकडून काही प्राणीमित्रांची मदत मागवण्यात आली होती. मात्र, त्याच प्राणीमित्रांकडून दरमहा १६ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या तक्रारीनंतर खडकपाडा पोलीस ठाणे येथे संबंधितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वाद अधिक चिघळत असतानाच सोसायटी परिसरात एका भटक्या कुत्र्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. प्राणीमित्रांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

एकाच वेळी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल झाल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे तपास सुरू असून रहिवाशांची सुरक्षितता आणि प्राण्यांचे हक्क यामध्ये संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र आहे. या प्रकरणाकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon