प्रियकराकडून दुसऱ्या तरुणीच्या केसांचे कौतुक, संतापलेल्या प्रेयसीने तरुणीचे केसच कापले; तिघांवर गुन्हा दाखल

Spread the love

प्रियकराकडून दुसऱ्या तरुणीच्या केसांचे कौतुक, संतापलेल्या प्रेयसीने तरुणीचे केसच कापले; तिघांवर गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – प्रियकराने आपल्या मैत्रिणीच्या केसांची स्तुती केल्याचा राग मनात धरून एका २१ वर्षीय तरुणीने धक्कादायक कृत्य केले आहे. आपल्या दोन मैत्रिणींच्या मदतीने या तरुणीने पीडितेच्या घरात घुसून तिचे केस कापले आणि या संपूर्ण प्रकाराचे ‘हेअर, नो हेअर’ म्हणत चित्रीकरण केले. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आरोपी तरुणीसह तिच्या तीन मैत्रिणींवर २६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणीची ओळख काही काळापूर्वी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराशी झाली होती. आरोपीचा प्रियकर इन्स्टाग्रामवरून पीडितेच्या संपर्कात होता. संवादादरम्यान त्याने पीडितेच्या केसांचे कौतुक आपल्या प्रेयसीसमोर केले. इतकेच नाही तर, “मी तुझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे,” असे त्याने सांगितल्याने प्रेयसीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि ती प्रचंड चिडली.

७ मार्च रोजी आरोपी तरुणीने पीडितेचा मोबाईल तपासला होता, पण तेव्हा तिला काहीही संशयास्पद आढळले नव्हते. मात्र, मनात राग धरून तिने २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. आईस्क्रीमची डिलिव्हरी आली असावी, असे वाटून पीडितेने दरवाजा उघडताच आरोपीने तिला बाहेर ओढले आणि कात्रीने तिचे केस कापण्यास सुरुवात केली.

यावेळी आरोपीच्या सोबत आलेल्या मैत्रिणींनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये व्हिडीओ केले. केस कापल्यानंतर “हेअर, नो हेअर” असे म्हणत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. इतकेच नाही तर कापलेले काही केस सोबत घेऊन ती तिथून निघून गेली. पीडितेने केलेल्या आरडाओरड्यानंतर इमारतीतील नागरिक जमा झाले, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाल्या होत्या.वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, प्रियकर आणि पीडित यांच्यातील संबंधांच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.यावेळी आरोपीच्या सोबत आलेल्या मैत्रिणींनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये व्हिडीओ केले. केस कापल्यानंतर “हेअर, नो हेअर” असे म्हणत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. इतकेच नाही तर कापलेले काही केस सोबत घेऊन ती तिथून निघून गेली. पीडितेने केलेल्या आरडाओरड्यानंतर इमारतीतील नागरिक जमा झाले, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाल्या होत्या.वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, प्रियकर आणि पीडित यांच्यातील संबंधांच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon