विरार–वैतरणा दरम्यान भीषण अपघात; डाऊन मार्ग ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – विरार आणि वैतरणा स्थानकादरम्यान गुरुवारी दुपारी घडलेल्या गंभीर रेल्वे अपघातामुळे पश्चिम रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेससमोर अचानक एक अज्ञात व्यक्ती आल्याने हा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की संबंधित व्यक्ती एक्सप्रेसच्या समोरील जाळीत अडकला. त्यामुळे गाडी तातडीनं थांबवावी लागली.दरम्यान मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु असल्यामुळे एक तासाहून अधिक काळ डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
या घटनेचा फटका लोकल सेवेलाही बसला असून विरारहून सुटणारी ३:०५ वाजताची डहाणू लोकल नारिंगी–घासकोपरी दरम्यान थांबवण्यात आली होती.तसच ३:४५ वाजताची विरार–डहाणू लोकल विरार स्थानकातच रोखून ठेवण्यात आली. डहाणू आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
रेल्वे प्रशासनाकडून अपघात ग्रस्त व्यक्तीचा गाडीच्या जाळीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.