सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
धुळे – सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी आणि ह्रदद्रावक घटना घढली. जिल्ह्यातील शिरपूरकडून सप्तशृंगी गडाकडे पायी जाणाऱ्या भाविकांना चार चाकी वाहनाने चिरडल्याने या अपघातात एका ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन भाविक गंभीरित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर पायी यात्रेतील इतर बांधवांनी संताप व्यक्त करत तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली.
अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आमदार काशीराम पावरा यांनी तात्काळ रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली. शिरपूर तालुक्यातील दहिवद फाटा येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुवारी ही दुर्घटना घडली. मध्य प्रदेशकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाने भाविकांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली.