मिरा भाईंदर परिसरात अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा-भाईंदर – मुंबईजवळील मिरा भाईंदर परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आलीआहे. मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या भीषण घटनेमध्ये ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात सापडल्या आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केलं. परिसरातील चार ते पाच इमारती या आगीच्या विळख्यात सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग इतक्या वेगाने पसरली की, काही घरांनाही तिचा फटका बसला. घटनेनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून वातावरण अत्यंत धोकादायक बनले आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, ही आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक तास प्रयत्न करण्यात आले.या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने परिसर सुरक्षित करण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, काही प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलेंडर स्फोटाची शक्यता वर्तवली जात आहे.