ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी; डोंबिवलीत मेकअप आर्टिस्टची १२.८५ लाखांची फसवणूक

Spread the love

ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी; डोंबिवलीत मेकअप आर्टिस्टची १२.८५ लाखांची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली : ऑनलाइन गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवत डोंबिवलीतील एका मेकअप आर्टिस्ट महिलेची तब्बल १२ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे ऑनलाइन गुंतवणूक योजनांच्या वाढत्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.

मीरा किशोर देसाई (रा. रुणवाल गार्डन परिसर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अल्प रकमेवर अधिक परतावा देऊन आरोपींनी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवत त्यांनी मोठी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले.

महिलेने टप्प्याटप्प्याने एकूण १२ लाख ८५ हजार रुपये गुंतवल्यानंतर संबंधितांनी अचानक संपर्क तोडला. तसेच परतावा देणेही बंद केल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.

याप्रकरणी महिलेने मानपाडा पोलीस ठाणे तसेच सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon