मिरा-भाईंदरची पहिली महासभा गाजली; टिपू सुलतान चौकाचं नाव खान अब्दुल गफार खान देण्याचा ठराव मंजूर
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा-भाईंदर – मिरा-भाईंदर महापालिकेची पहिली महासभा बुधवारी गाजली ती टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्यात येण्याच्या मुद्यावरुन. भाजपाचे संजय पवार यांनी महासभेत हा ठराव मांडला होता. याला कॉंग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी स्थापन केलेल्या मिरा भाईंदर विकास आघाडीने हरकत घेतली होती. मात्र, लास्ट मुव्हमेंटला मिरा भाईंदर विकास आघाडीने युटर्न घेत, टिपू सुलतान चौकच्या नावाऐवजी स्वातंत्र्य लढयातील महान नेता खान अब्दुल गफार खान यांच नाव सुचवलं तर भाजपाने थोर स्वातंत्र्यसेनानी अशफाक उल्ला खान यांच नाव सुचवलं. ७७ विरुध्द १३ मताने अशफाक उल्ला खान यांच नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे.
आजची महासभा अनेक विषयांनी गाजली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेले अनेक विकास कामावर यावेळी आक्षेप घेण्यात आला. तसेच त्या कामांच्या चौकशीची मागणी देखील करण्यात आली. त्यात कोट्यावधी खर्च करुन बांधण्यात आलेलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादान, चेना नदीवरील पूल, तेथील रस्ते हे विशेष करुन एका बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच महासभेत जेवणाच्या वेळी पालिकेतर्फे ठेवण्यात आलेल्या व्हेज जेवणाचा मुद्दयावर ही काही नगरसेवकांनी आक्षेप घेत, नॉनव्हेज जेवणाची मागणी केली आहे.