व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत ३ लाखांची रोकड लुटणाऱ्या आरोपीची पोलीसांनी काढली धिंड
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यासह अजूबाजूच्या शहरांमध्ये ही सध्या गुंडीची मोठी दहशत आहेत. त्यात कोयता गँग सक्रीय होते. त्यांच्या कारनामे दिवसाआड पाहायला मिळतात. त्यांना पोलीसांची काही भीती राहीली आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. पुण्या प्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरातही अशा गुंडांची मोठी दहशत आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशा गुंडांचा चोख बंदोबस्त पिंपरी चिंचवड पोलीसांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. शिवाय त्याच्याकडून ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. शहाराच्या मध्यभागी असा घटना होत असल्याने जगायचे कसे असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला होता. आम्ही उद्योग व्यवसाय करायचे की नाही असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केले जावू लागले. या लुटीच्या घटनेनंतर तर व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण होते.
व्यापाऱ्यांच्या नाराजीची दखल पिंपरी चिंचवड पोलीसांनी घेतली. त्यांनी तातडीने या लुटमार करण्याऱ्या टोळीचा शोध घेतला. शिवाय काही तासातच त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केले. पोलीस ऐवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी त्यांची दहशत कमी व्हावी म्हणून एक शक्कल लढवली. चिंचवड गावातील ज्या केशवनगर भागात त्यांनी हा डाका टाकला होता. त्या भागात या आरोपींना नेण्यात आले. त्यानंतर सर्वां समोर या गुंडांची धिंड ही काढण्यात आली.
या गुंडांनी व्यापाऱ्यांना नुसते लुटलेच नव्हते तर त्यांच्यावर हल्लाही केला होता. मात्र त्याच ठिकाणी पोलिसांनी या आरोपींची धिंड काढून या परिसरात आरोपींनी निर्माण केलेली दहशत मोडीस काढली आहे. या प्रकरणात गुंडा विरोधी पथकाने आरोपी यश रमेश अंधारे, रितेश मुकेश चव्हाण, रूपेंद्र रुपबसंत बैस आणि एक अल्पवयीन मुलाला या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या विरोधात चिंचवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.