मुंबईत २० हून अधिक घरे आणि ३०० भक्त असलेल्या बांग्लादेशी मुळच्या ट्रान्सजेंडर ज्योती उर्फ अयान खान उर्फ गुरु माँला पोलीसांच्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्राच्या मुंबईच्या पोलिसांनी एका कारवाईत बांग्लादेशी मुळ असलेल्या ट्रान्सजेंडर ज्योती उर्फ अयान खान उर्फ गुरु माँला अटक केली आहे. ज्योती तृतीयपंथी असून गेल्या तीस वर्षांपासून खोट्या भारतीय दस्तावेजासह भारतात रहात होती आणि तिचे शेकडो भक्त देखील आहेत. पोलिसांच्या चौकशीत पुढे आले की ज्योतीचे खरे नाव बाबू अयान खान आणि मुंबईच्या गोवंडी, रफिक नगर, कुर्ला, देवनार, नारपोली आणि ट्रॉम्बे विभागात सक्रीय होती. या ज्योतीच्या मुंबईत २० हून अधिक संपत्ती आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून या प्रकरणात काही आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.
ट्रान्सजेंडर ज्योती उर्फ अयान खान हीचे तीनशेहून अधिक अनुयायी आहेत. हे अनुयायी तिला गुरु माँ म्हणून मानतात. मार्च २०२५ मध्ये शिवाजीनगर पोलिसांनी रफिक नगररातीन अनेक बांग्लादेशी ट्रान्सजेंडरना अटक केली होती. त्याचवेळी ज्योतीचे दस्तावेज देखील तपासले होते. त्यावेळी तिच्या आधार, पॅनकार्ड आणि वैध कागदपत्रे उपलब्ध होती. त्यामुळे त्यावेळी ज्योतीला सोडून देण्यात आले होते.
यानंतर पोलिसांनी तिच्या सर्व कागदपत्रांची सखोर तपासणी केली. त्यावेळी ही कागदपत्रे बनावट आढळली. त्यामुळे त्याआधारे ज्योतीला अटक करण्यात आली आहे.तपासात असे समजले की ज्योतीचे मुंबईत सुमारे २० हून अधिक घरे आहेत. ज्यातील अनेक घरे रफिकनगर आणि गोवंडी विभागात आहेत.या घरात तिचे अनुयायी राहातात आणि तिला आपला गुरु मानतात, परंतू आता ज्योतीच बांग्लादेशी असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी ज्योती उर्फ अयान खानच्या विरोधात पासपोर्ट अधिनियम आणि भारतीय न्या संहितेच्या (BNS)अनेक कलमांतर्ग गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता ज्योती नेमकी किती वर्षांपासून भारतात खोट्या बनावट दस्तावेजाआधारे रहात आहे ? तिला कागदपत्रे मिळवून देण्यात कोणी-कोणी मदत केली आहे. याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. तिच्या अनुयायांची देखील चौकशी केली जाणार आहे.