सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसावर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलानं सोमवारी कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली, यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन शेळके असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आमदार धस यांचा मुलगा सागर धस सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमाराला अहिल्यानगर-पुणे महामार्गावरून प्रवास करत होता. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागरच्या कारनं त्याला जोरदार धडक दिली. याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.