दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘भाईसाहेब’ सुमित जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर
रवि निषाद / मुंबई
कल्याण – दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुमित ऊर्फ भाईसाहेब जाधव यांना खडकपाडा, कल्याण पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या २० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले भाईसाहेब जाधव यांचे दलित चळवळीत मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, खडकपाडा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात खोट्या फसवणुकीचा गुन्हा दाखवून बदनामीचे षड्यंत्र रचले आहे.
याविरोधात भाईसाहेब जाधव यांनी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली, जिथे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील अॅड. राज कांबळे यांनी त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली. फिर्यादीने भाईसाहेब जाधव यांनी पैसे घेऊन फसवणूक केली असल्याचा आरोप केला होता. मात्र अॅड. कांबळे यांनी न्यायालयात ठोस युक्तिवाद सादर करत श्री. जाधव यांची निर्दोषता पटवून दिली. त्याआधारे माननीय न्यायालयाने भाईसाहेब सुमित जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.