पुण्यात बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची सर्वात मोठी कारवाई, एकाचवेळी १२३ जणांना अटक

Spread the love

पुण्यात बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची सर्वात मोठी कारवाई, एकाचवेळी १२३ जणांना अटक

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे – पुण्यातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. १५० ते २०० पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीमध्ये हे कॉलसेंटर चालवलं जात होतं. दरम्यान या कॉल सेंटरमधून नेमके काय प्रकार चालत होते त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. खराडी परिसरात प्राइड आयकॉन नावच्या इमारतीमध्ये ९ व्या मजल्यावर बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांनी धाड टाकली आहे. या प्रकरणी १२३ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवरून सदरची तक्रार केंद्रीय गृह मंत्रालयाला देण्यात आली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पुणे पोलिसांनी ही सर्वात मोठी कारवाई केली. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुणे पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पुणे सायबर पोलीस,गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. बनावट कॉल सेंटर प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आलीय तर २ जण फरार आहेत. इतर १२३ पेक्षा अधिक या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

बनावट कॉल सेंटर मध्ये जे मोबाईल लॅपटॉप ब्लॅकमेलिंगसाठी आणि फसवणूक करण्यासाठी वापरले जायचे ते ४१ मोबाईल आणि ६२ लॅपटॉप पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेले आरोपी गुजरातचे असल्याची माहिती. तर महाराष्ट्रातील काही लोक यामध्ये सहभागी असल्याचे समजत आहे. परदेशातील नागरिकांना यामध्ये टार्गेट केलं जायचं आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक केली जायची. करण शेखावत यामध्ये मुख्य आरोपी असून १२३ लोक या ठिकाणी काम करत होते. गेल्या ३ महिन्यापासून हे काम या ठिकाणी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील खराडीत बोगस कॉल सेंटर सुरू होतं त्याआधारे सायबर भामटे हे अमेरिकेतील नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लुटत होते. तब्बल १२३ लोक या सेंटरवर काम करायचे यांच्याकडून लाखो अमेरिकन लोकांचा डिजीटल डाटा मिळून आला आहे. मुख्य आरोपी करण शेखावत, संजय मोरे केरन रवाने हे आहेत. गेल्या जुलै २०२४ पासून हे बोगस सायबर सेंटर सुरू होते. पोलीस सहआयुक्त रंजन शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली. तब्बल १२३ लोक या सेंटरवर काम करायचे यांच्याकडून लाखो अमेरिकन लोकांचा डिजिटल डाटा मिळून आला आहे. या सेंटरमधून दररोज ३० ते ४० हजार डॉलर कमाई होत होती. अंतरराष्ट्रीय पातळीवरून सदरची तक्रार केंद्रीय गृह मंत्रालयाला देण्यात आली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुणे पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पुणे सायबर पोलीस,गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सहआयुक्त रंजन शर्मा यांनी सांगितले. अटक केलेले आरोपी गुजरातचे तर काही महाराष्ट्रातील लोक यामध्ये सहभागी असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon