शिळफाटा रस्त्यावरील बिअरबार मालकांकडे हप्ते मागणाऱ्या माहिती कार्यकर्त्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Spread the love

शिळफाटा रस्त्यावरील बिअरबार मालकांकडे हप्ते मागणाऱ्या माहिती कार्यकर्त्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पोलीस महानगर नेटवर्क 

कल्याण – कल्याण शिळफाटा रस्त्यावर अनेक डान्सबार, बिअरबार व वाईनशॉप आहेत. यातील अनेक बिअरबार , डान्सबार बेकायदेशीर सुरू असतात याचाच फायदा काही तथाकथित माहीत अधिकार कार्यकर्ते घेत असतात. स्त्यावरील १७ बिअरबार मालकांकडे मागील काही महिन्यांपासून दरमहा प्रत्येकी २० हजार रूपये हप्ता मागणारा एक माहिती कार्यकर्ता, स्वताला पत्रकार समजणाऱ्या त्या व्यक्तीची डोंबिवलीतील एका इसमाची बिअरबार चालकांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या इसमाची बिअरबार चालकांकडे हप्ता मागण्याची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांसमोर सामायिक झाली आहे. पोलीस उपायुक्त झेंडे यांनी या तक्रारीची दखल घेऊन संबंधित माहिती कार्यकर्त्याची सर्व माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश मानपाडा पोलिसांना दिले आहेत. बिअरबार चालकांनी माध्यमांना सांगितले, मागील काही महिन्यांपासून डोंबिवलीतील एक माहिती कार्यकर्ता आणि स्वताला पत्रकार समजणारा एक इसम शिळफाटा रस्त्यावरील १७ बिअरबार मालकांकडे येऊन प्रत्येकी दर महिन्याला २० हजार रूपये हप्ता देण्याची मागणी करत आहे. ही मागणी पूर्ण केली नाहीतर तुमचे बिअरबार मी बंद पाडतो. तुम्ही याठिकाणी कसे व्यवसाय करता ते बघतो, अशी धमकी हा इसम देत असल्याचे बिअरबार चालकांनी तक्रारीत म्हटले आहे. आणि माध्यमांनाही त्यांनी ही माहिती दिली आहे.

हा माहिती कार्यकर्ता अनेक वेळा आपल्या पाच ते सहा मित्रांना घेऊन बिअरबारमध्ये येतो. महागड्या दारू पितो. त्याच्याकडे देयक मागितले की माझ्याकडे कसले पैसे मागता. देयक मिळणार नाही, अशी उलट भाषा करून बिअरबार चालकांना दमावर घेतो. देयक न देता निघून जातो. बिअरबारमध्ये कर्मचारी तैनात असताना किरकोळ कारणांवरून हा इसम पोलीस ठाण्यात तक्रारी करतो. पोलिसांविषयीही तो असभ्य भाषा वापरतो, असे बिअरबार चालकांनी सांगितले. या इसमाकडून नियमित होत असलेल्या त्रासामुळे आम्ही त्रस्त आहोत. म्हणून आम्ही याविषयी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. पोलीस उपायुक्तांनी या इसमावर असलेले गु्न्हे तपासून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश मानपाडा पोलिसांना दिले आहेत. या इसमावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon