नशिबी दारिद्र्य अन् दारूचं व्यसन, लेकासोबत पेग रिचवत बसलेल्या बापाने स्वत:च्या लेकाची केली अत्यंत निघृणपणे हत्या

Spread the love

नशिबी दारिद्र्य अन् दारूचं व्यसन, लेकासोबत पेग रिचवत बसलेल्या बापाने स्वत:च्या लेकाची केली अत्यंत निघृणपणे हत्या

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड – नशिबी आलेलं दारिद्र्य त्यात दारूचं व्यसन यातून संतापलेल्या बापाने उचललेलं पाऊल हैराण करणारं आहे. बीडमधील माजलगाव शहराजवळील खानापूर येथे राहणाऱ्या एका बापाने स्वत:च्या लेकाची अत्यंत निघृणपणे हत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. रोहीत गोपाळ कांबळे असं मृत तरूणाचं नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे. मृत मुलगा आणि आरोपी असलेला बाप या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच कुरबुरी व्हायच्या. आठ दिवसांपुर्वीच रोहीत कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. दोघेही एकत्र दारू प्यायला बसायचे. मात्र दारू आणण्यावरुन, आर्थिक कारणांवरुन दोघांमध्ये नेमकी भांडत होत असयाचं. रविवारी ४ मे रोजी सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कुरबूर झाली. यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला.

घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक आकाश माकणे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. आरोपीला पोलीसांनी घटनास्थळाहून अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon