शिवडीतील जैन मंदिरातील दागिने चोरी प्रकरणात तिघांना अटक, पोलिसांकडून ७.१५ लाखांचा ऐवज जप्त: र.अ.कि. मार्ग पोलीस ठाण्याची कारवाई
मुंबई – शिवडी येथील श्री शिवडी जैन संघाच्या बंद मंदिरातून देवतांच्या मुर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या तीन आरोपींना शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही चोरी २२ एप्रिलच्या रात्री ते २३ एप्रिलच्या पहाटे दरम्यान घडली होती. फिर्यादी विपिन छगनलाल लालन (वय ५७) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे कुलूप तोडून सोन्याचे टिके, कपटी, चांदीचे मुकुट व दानपेटीतली रक्कम असा एकूण सुमारे रू. ७,१५,००० चा ऐवज चोरीला गेला होता. आरोपींनी चेहऱ्यावर रुमाल बांधले होते आणि कॅमेरे लांब असल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते. मात्र तपास पथकाने २९ ठिकाणांवरील ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींचा माग काढत, गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील तीन आरोपी सुनीलसिंह सुरजसिंह दाभी (२३), राहुलसिंह प्रवीणसिंह वाघेला (२०) व जिगरसिंह दिनेशसिंह वाघेला (१९) यांना २ मे २०२५ रोजी अटक करण्यात आली.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून संपूर्ण चोरीचा ऐवज हस्तगत केला असून, पुढील तपास सुरु आहे. ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त, सत्य नारायण, अपर आयुक्त, अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ – ४) श्रीमती आर. रागसुधा आणि मा. सहाय्यक आयुक्त (माटुंगा विभाग) श्री. योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत आर.ए. के. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप रणदिवे, गुन्हे विभागाचे पो.नि. संदीप ऐदाळे, सपों. महेश मोहिते, सपों. गोविंद खैरे, सहायक फौजदार सुरेश घार्गे, आणि पोहवा अनिल कोळेकर, ज्ञानेश्वर केकाण, काशीनाथ शिवमत, कमलेश शेडगे, तसेच पोशि. समिकांत म्हात्रे, किरण देशमुख, निखिल राणे, जितेंद्र परदेशी व पोह. गोविंद ठोके यांनी मेहनत घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली.