जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे अट्टल चोराला डोंबिवली पोलीसांकडून बेड्या

Spread the love

जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे अट्टल चोराला डोंबिवली पोलीसांकडून बेड्या

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – डोंबिवली परिसरात नागरिकांच्या सतर्कतेमुळे जबरी चोरी करणाऱ्या आरोपी हे दि. २६/०४/२०२५ रोजी एस.बी.आय. बँकेसमोर, टिळकरोड, डोंबिवली पुर्व येथे त्यांच्यात मारामारी चालु असल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे यांना फोनद्वारे माहिती मिळाल्याने, सदरची माहिती रात्रौगस्त अधिकारी, बिट अंमलदार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांना देवुन, तात्काळ रवाना केले. पोलीस स्टाफने मारामारी करणारे दोन अनोळखी इसम यांना जाग्यावरच ताब्यात घेतले. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांकडे चौकशी केली असता, मारहाण करणारे दोन इसमांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून व चाकुचा धाक दाखवुन पिडीत व्यक्तीचे खिशातुन पैसे काढुन घेतले असुन, त्यांनी चाकु हवेत फिरवुन व कोणी पुढे आला तर वार करण्याची धमकी दिली, बाबत सांगीतले. ताब्यात घेतलेल्या दोन इसमांना पोलीस ठाण्यात आणुन त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) तेजस राजु देवरूखकर, वय.२३ वर्षे, रा.ओशियन प्राईड, रूम नं.०१, संतोषी माता मंदीराजवळ, सोनारपाडा, डोंबिवली पुर्व, २) सुजित विजय थोरात, वय. २० वर्षे, रा.आरो पार्क बिल्डींग, रूम नं.२०१, सोनारपाडा, डोंबिवली पुर्व, अशी असल्याचे सांगीतले. त्यांचे अंगझडतीमध्ये जबरी चोरी केलेले एकुण ४०००/- रू. रोख रक्कम व एक स्टीलचा चाकु जप्त करण्यात आला आहे.

घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने फिर्यादी राहुल शंकर चौरसीया, वय.२५ वर्षे, रा.आंबेडकर नगर, सावरकर रोड, डोंबिवली पूर्व यांचे फिर्यादीवरून डोंबिवली पोलीस ठाणे, गु.रजि नं.३४०/२०२५ भा.न्याय संहिता कलम ३०९ (६), ११५(२), ३५१(२), ३(५) सह म.पो.का. कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. नमुद गुन्हयातील जबरी चोरी केलेली रोख रक्कम ४०००/- व गुन्हयात वापरलेला चाकु असे आरोपींकडुन १०० जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सचिन देसाई हे करत आहेत. तेजस राजु देवरूखकर मानपाडा पो. ठाणे, गु.रजि.नं. ९२८/२०२३ आर्म ऍक्ट ४, २५ प्रमाणे तर सुजित विजय थोरात याच्यावर टिळकनगर पोलीस ठाणे, गु.रजि नं.४३/२०२४ भा.द.वि.क.४५४, ४५७, ३८०, टिळकनगर पोलीस ठाणे, गु.रजि नं.४५४/२०२४ एन.डी.पी.एस.८ (क), २७ व टिळकनगर पोलीस ठाणे, गु.रजि नं.५७५/२०२४ एन.डी.पी.एस.८ (क), २७ याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३ कल्याण, सहा पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बळवंत भराडे, पोउनि सचिन देसाई, पोहवा १९२४ भणगे, पोहवा ६८१७ चौधरी, पोना ७०९२ कोळेकर, पोशि ३४०६ राठोड, पोशि/८४१३ सांगळे, पोशि १८१ वाघमारे, चालक पोशि/कदम यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon