कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये केळीच्या पानावरुन वाद; एकाचा खून, तर दोनजण जखमी, बाजारपेठ पोलिसांकडून आरोपीला अर्ध्या तासात बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – येथील ‘एपीएमसी मार्केट’ मधील फुल मार्केट परिसरात रविवार दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास आरोपी चिराग राजकुमार सोनी’ वय २१ वर्ष धंदा फुल मार्केट राह. शिवकृपा चाळ, पत्री पूल कल्याण पूर्व व मयत चमनलाल नंदलाल कारला वय ५५ वर्ष व मयताचा मुलगा कार्तीक यांच्यामध्ये केळीच्या पानावरुन वाद झाला. यातील आरोपी विराग राजकुमार सोनी’ वय २१ वर्ष व मयत इसम चमनलाल नंदलाल कारला वय ५५ वर्ष या दोघांसाठी जळगाव वरून केळीच्या पानाचे पाच बंडल हे विक्री करिता आले होते. त्यापैकी एक बंडल हा आरोपी याचे होते तर चार बंडल हे मयत इसमाचे होते. मात्र सदरच्या केळीच्या पानाचे बंडल मयत इसम चमनलाल कारला याने यातील आरोपीला न विचारता विक्री करीता घेवुन गेला. सदर केळीच्या पनाचे बंडल आरोपी हा मयत इसमाकडे मागायला गेला असता मयत इसमाने में नहीं दूंगा, तेरे को जो करना है ओ कर” असे बोलल्याने सदर गोष्टीचा मनात राग धरून आरोपी याने कात्रीने मयताच्या छातीवर, पोटावर सपासप वार केल्याने तो जागीच ठार झाला. तसेच मयत याचा मुलगा कार्तिक कारला व त्याची पत्नी नितुदेवी कारला मध्ये आल्याने त्यांनाही आरोपीने कात्रीने वार करून जखमी केले आहे.
सदर घटना घडल्याच्या ३० मिनिटाच्या आत आरोपी विराग राजकुमार सोनी वय २१ वर्ष याला पोलीस उप आयुक्त, परीमंडळ -३, कल्याण, श्री. अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग श्री कल्याणजी घेटे तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश गाडवे पालोम उपनिरीक्षक, ज्ञानेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक, निसार तडवी, पोलीस शिपाई, विशाल राठोड पोलीस शिपाई, अक्षय गिरी यांनी चक्कीनाका, कोळशेवाडी परीसरातून पळून जात असताना शिताफिने तात्काळ आरोपीला पकडून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीवर बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. २८१/२०२५ भा.न्या.सं. १०३(१), १०९. ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब दुकले हे करीत आहेत. आरोपीतास कठोरात कठोर शिक्षा होईल याप्रमाणे पुढील तपास चालु आहे.