नवी मुंबईतील बिल्डर गुरु चिचकरांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; मृतदेहाशेजारी पोलिसांना सापडली सुसाइड नोट
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकरचे वडील गुरु चिचकरने शुक्रवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. चिचकरने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आहे. त्याच्या मुलावर नार्को टेस्ट विभागाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकारने स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी गुरु चिचकरने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. जी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकर हे भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकरचे वडील आहेत. नवीन चिचकर हा सध्या देश सोडून पळून गेला आहे. नवीन चिचकर हा एनसीबीला अनेक गुन्ह्यांमध्ये हवा आहे.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर देशाबाहेरून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवत आहे. नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरु चिचकरने शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. गुरू चिचकरने डोक्यात गोळी झाडली असून नवी मुंबई पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. एनसीबी ने नवीन चिचकर विरुद्ध आरसीएन (लूक आऊट नोटीस) देखील जारी केले आहे. आत्महत्या करण्यासाठी ९ एम एम गोळीच्या पिस्तूलाचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी गुरु चिचकरने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. जी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे. त्याचा मुलगा नवीन चिचकरवर नार्को टेस्ट विभागाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. या विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीत तसा उल्लेख करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीत आणखी कशाचा उल्लेख केला आहे का? याबाबतची माहिती मिळालेली नाही. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.