धक्कादायक ! अल्पवयीन मुलांकडून नऊ वर्षाच्या बालकावर अत्याचार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्यात दिवसेंदिवस लहान मुलांवर अत्याचार वाढत चालले आहेत. अत्याचाराच्या घटनांमध्ये लहान मुलांना टार्गेट केलं जात आहे. अशीच एक मुंबईत घडली आहे. नऊ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन्ही विधीसंगर्षग्रस्त मुलांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
दोन्ही विधिसंघर्षग्रस्त मुले १४ वर्षांची आहेत. त्यांनी पीडित मुलावर अत्याचार केला. याबाबतची माहिती पीडित मुलाकडून आईला समजली असता तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री भारतीय न्याय संहिता कलम १२७(२) व लैंगिक अत्याचारापासून संरक्षण ( पोक्सो )कायदा कलम ४,६, १० अंतर्गत गुन्हा दाखल केला. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. विधीसंगर्षग्रस्त मुलाच्या घरात हा प्रकार घडला असून त्या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही चित्रिकरण सापडलेले नाही. खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलाला दोन्ही अल्पवयीन मुलांनी घरी नेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंचासह घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.