अंमली पदार्थ विक्रीसाठी मुंबईहून कल्याणमध्ये आलेल्या दोन इसमाना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – पोलीस उपायुक्त परिमंडळ – ३ च्या विशेष पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत कोडेन फॉस्फेट व अल्प्राझोलम टॅब्लेट्स आयपी ०.५ मिग्रॅ अल्प्राटन -५ गोळ्या” हा अंमली पदार्थ कुर्ला मुंबईहुन कल्याणमध्ये विक्री करीता घेवुन आलेल्या दोन आरोपींकडून हस्तगत करण्यात आले. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशान्वये कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साबाजी नाईक (प्रशासन) तसेच विशेष कारवाई पथकाचे अधिकारी स.पो.नि. अनिल गायकवाड, पोलीस अंमलदार स.पो. उपनिरी. जितेंद्र ठोके, पो.शि. अमित शिंदे, पो.शि. खुशाल नेरकर, पो.शि. राहुल शिंदे असे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३, कल्याण यांच्या आदेशान्वये कोळसेवाडी पोलीस ठाणे, कल्याण पूर्व च्या हददीत बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर व अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरीता खाजगी वाहनांवरून प्रतिबंध गस्ती करीता रवाना झाले होते
सदरचे पथक दिनांक २२/०४/२०२५ रोजी मेट्रो मॉलचे परिसरात आले असता मेट्रो मॉल समोरील सार्वजनिक रोडवर, रिक्षा स्टेंडजवळ, कल्याण पूर्व या ठिकाणी उभी असलेली एका काळया पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची रिक्षा क्रमांक एम एच ०३ सी.एन. ८११० यामधील बसलेले दोन इसम १) मोहम्मद रफिक अब्दुल सलाम, ( ४६), व २) अब्दुल सादिक अब्दुल सलाम शेख, (४८) यांच्या हालचाली संशयीत वाटल्या. तेव्हा पोलीस पथकाने सदर इसमांना अटकाव करून त्यांचा पंचासमक्ष अंगझडती पंचनामा करण्यात आला असता त्यांच्या ताब्यातुन एका काळया रंगाचे सँगबेंग मधुन बेकायदेशीर कोडेन फॉस्फेट सिरप हा अंमली पदार्थ तसेच अल्प्राझोलम टॅब्लेट्स आयपी ०.५ मिग्रॅ अल्प्राटन -५ गोळ्या असे एकुण २७,०८०/- रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. या बाबत सदर इसमांविरूध्द कोळसेवाडी पोलीस ठाणे, कल्याण पू. येथे गु.र.नं. ३१८/२०२५ एन.डी.पी.एस. ऍक्ट १८८५ चे कलम ८ (क), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी अतुल झेंडे, पोलीस उप-आयुक्त. परिमंडळ -३, कल्याण, कल्याणजी पेटे, सहायक पोलीस आयुक्त . कल्याण विभाग, तसेच पो.नि. साबाजी नाईक, कोळसेवाडी पोलीस ठाणे, कल्याण पू. स.पो.नि. अनिल गायकवाड, स.पो.उपनिरी. जितेंद्र ठोके, पो.शि. अमित शिंदे, पो.शि. खुशाल नेरकर, पो.शि. राहुल शिंदे यांनी केली..