पुण्यातील उद्योगपतीचा ‘सायबर मर्डर’; ई-मेलद्वारे बिहारला बोलावून संपवलं; खळबळजनक घटनेचा तपास सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात खून झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे अस हत्या झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. कंपनीच्या कामासाठी ई-मेल करत पाटण्यात बोलावून घेत उद्योगपतीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण साधू शिंदे (५५) हे कोथरूड परिसरातील उद्योगपती असून त्यांना कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो, असा ई-मेल आरोपींकडून करण्यात आला होता. या ई-मेलद्वारे लक्ष्मण शिंदे यांना पाटण्यात बोलावून घेण्यात आले.कंपनीसाठी स्वस्तात मशिनरी मिळेल, यासाठी उद्योगपती लक्ष्मण शिंदे हे बिहारला गेले होते. उद्योगपती शिंदे पाटण्यात पोहोचतच त्यांचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्यांना एका शेतात नेऊन पैशांची मागणी करण्यात आली. मात्र उद्योगपती शिंदे यांनी पैसे दिले नाही, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात तीन ते चार आरोपी असल्याचे माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
दरम्यान, उद्योगपती पुन्हा परतले घरी परतले नसल्याने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष्मण शिंदे हे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. काल पाटण्यात उद्योगपती शिंदे यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर कोथरूडमधील उद्योगपतीचा ‘सायबर मर्डर’ झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.