मुंबई पोलीस परिमंडळ – ७ मधील शालेय परिसर तंबाखूमुक्त
रवि निषाद/मुंबई
मुंबई – मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्त यांच्या आदेशाने मुंबई पोलीस परिमंडळ ७ मधील सर्व शालेय परिसर तंबाखूमुक्त करणारा कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरूवार २७ मार्च रोजी अपर पोलिस आयुक्त यांच्या उपस्थित मुलुंडमधील कालिदास कोळंबकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या कारभाराला १०० दिवस पूर्ण झाल्याने मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशावरुन मुंबईतील सर्व परिमंडळ परिसरात असलेला शालेय परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी एक अभियान राबविवले होते. त्यानुसार मुलुंड परिमंडळ ७ मधील एकूण ८ पोलिस स्टेशन मधील शालेय परिसर तंबाखूमुक्त अभियान राबविवले गेले. अपर पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटिल आणि पोलिस उपायुक्त विजयकुमार सागर यांच्या देखरेखाखाली सर्व पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात निर्भया पथक मार्फत सदर कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमात काही एनजीवो आणि वृत्तपत्राचे प्रतिनिधि देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात अपर पोलिस आयुक्त यांनी सांगतले की, २५७ शाळा आणि ३८ महाविद्यालयात या कार्यक्रमाचा सुचना फलक लाऊन त्याना आणि त्यांचे आसपास असणाऱ्या पानटपरी वाल्यांना तंबाखूमुक्त परिसर ठेवन्याचे निर्देश दिले होते. यात ६३५ इसमाविरोधात कारवाई करुण त्यांच्याकडून १ लाख २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सदर कार्यक्रमात अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटिल, परिमंडळ ७ चे पोलिस उपायुक्त विजयकुमार सागर, सिने कलाकार पुष्कर श्रोती, हास्य कलाकार गौरव मोरे आणि सर्व सहायक पोलिस आयुक्त आणि सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक ठाणे अमलदार उपस्थित होते,पंतनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवले यांच्या पोलिस स्टेशनचा हद्दीत शालेय परिसर तंबाखूमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ति आठवले आणि कार्यक्षम महिला पोलिस सब इंस्पेक्टर सोनाली पवार यांचे योगदान लाभले. या कार्यक्रमात त्यांच्यासह सर्व पोलिस स्टेशनचा निर्भया पथक अधिकारियांचा वरिष्ठ अधिकारयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.