संत तुकाराम यांचे ११ वंशज प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

Spread the love

संत तुकाराम यांचे ११ वंशज प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

योगेश पांडे/वार्ताहर

पुणे – संत तुकाराम यांचे ११ वंशज प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिरीष महाराजांनी उचललेल्या टोकाच्या पावलाने देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या २० दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या शिरीष महाराज मोरे यांनी वयाच्या ३० व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं. एवढा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, त्यांची एक सुसाईड नोट मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. शिरीष महाराज यांचा मृतदेह बुधवारी सकाळी राहत्या घरात आढळून आला. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, बुधवारी सकाळी बराचवेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते. दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला.

शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या का केली, याची चर्चा सुरू आहे. शिरीष महाराज मोरे यांनी सुसाईड नोटमध्ये आपल्या या निर्णयाचे कारण सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिरीष महाराज मोरे हे उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. येत्या २० फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह पार पडणार होता. मात्र, हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शिरीष महाराज यांनी आर्थिक परिस्थितीच आत्महत्येचे कारण सांगितले आहे. शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय होते. संघाचे ते प्रचारक होते. त्याशिवाय शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे वादग्रस्त आवाहन केल्याने शिरीष महाराज हे चर्चेत आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon