कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकाकडून प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; महात्मा फुले चौक पोलीसांनी आरोपी रिक्षा चालकाला घेतले ताब्यात

Spread the love

कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकाकडून प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; महात्मा फुले चौक पोलीसांनी आरोपी रिक्षा चालकाला घेतले ताब्यात

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या समोर रिक्षा चालकाकडून बस कंडक्टरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी आहे. त्यातच कल्याणमध्येही रिक्षा चालकाच्या मुजोरीचं प्रकरण समोर आलं आहे. रिक्षामध्ये पुढे बसण्यावरुन झालेल्या वादात रिक्षा चालकाने प्रवाशांवर प्राणघातक हल्ला केला आहे. कल्याण स्टेशनच्या परिसरातच ही घटना घडली. या हल्ल्यात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेले अन्य दोन जणही गंभीर जखमी झाले आहेत. रौफ पोके असं या मुजोर रिक्षा चालकाचं नाव आहे. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी प्रवाशांवर हल्ला करणाऱ्या या रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे. कल्याण स्टेशन समाेरच घडलेल्या या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण स्टेशन परिसरात हा रात्रीच्या वेळी देखील वर्दळीचा असतो. कल्याण हे जंक्शन असल्याने लाखो प्रवासी या रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशी स्टेशनला येतात. त्याचबरोबर स्टेशनबाहेर गर्दी असते. स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे. त्याठिकाणी अंधारही असतो. या अंधारात प्रवाशांना रिक्षा पकडून घर गाठायचे असते. कल्याण स्टेशनसमोर गुरुवारी मध्यरात्री राकेश हा प्रवाशी भिवंडीसाठी रिक्षा पकण्याकरीता आला. रिक्षा चालकानं त्याला पुढं बसण्याची सूचना केली. राकेशनं त्याला नकार दिल्यानं दोघात जोरदार वाद झाला. त्यावेळी रिक्षाचालक रौफनं जवळचा चाकू काढून राकेशवर प्राणघातक हल्ला केला.

राकेशला वाचवण्यासाठी दोन जणांनी मध्यस्थी केली. त्यांच्यावरही चाकू हल्ला करण्यात आला. यश चोगला आणि विनित अशी या दोन जखमी प्रवाशांची नावं आहेत. कल्याण पोलिसांनी रिक्षा चालक रौफला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon