रियल इस्टेट व्यावसायिकाकडून १ कोटीच्या खंडणी, आरोपी अटकेत
रवि निषाद/मुंबई
मुंबई – पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका रियल इस्टेट व्यावसायिकाकडून १ कोटी खंडणीची मागणी करणाऱ्या हप्तेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या नाव आलम विस्मिल्ला खान, ४८ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुर आलम मतीदिन खान उर्फ़ बबलू टेंबा ४३ वर्ष या रियल इस्टेट व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आलम बिस्मिल्ला खान यानी फोन द्वारे खंडणीची मागणी केली होती. तडजोड करुन आरोपी यानी १ कोटीमध्य सेटल केला होता. त्यानंतर नुरआलम मतीदिन खान यांचा तक्रारावरुन पोलिसांनी गु.र.क्र ३८/२०२५ कलम ३०८(४),३५१ अणि ३५२(२) बीएनएस अशा गुन्हा नोंद केला होता.हकीकत अशी की दिनांक १७/१०/२०२४ रोजी दुपारी ०३:५४ वाजता ते ०३:५६ वाजेच्या दरम्यान आरोपीनी फोन करुन खंडणीची मांगनी केली होती.वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यानी सांगतले की, घटनेचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक भापकर आणि रात्रौपाळीJ पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक सानप यानी या प्रक्रणाचा सखोल तपास करुन आरोपी आलम खान याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.