गाड्यांचा अपघातामुळे ड्रग्स तस्करीचा भंडाफोड; स्कूटी सोडून आरोपी फरार. कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

गाड्यांचा अपघातामुळे ड्रग्स तस्करीचा भंडाफोड; स्कूटी सोडून आरोपी फरार. कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

योगेश पांडे/वार्ताहर 

रायगड – कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर तीन गाड्यांचा अपघात झाला. त्यावेळी दोन दुचाकी चालक यांच्या भांडण झाले आणि गर्दी जमल्याचे बघून त्यातील एक दुचाकीचालक अन्य सहकाऱ्यांसह पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र घटना स्थळी पोलिसांना सापडलेल्या टीव्हीएस स्कुटी गाडीच्या डिक्कीत गांजा आणि चरस या अमली पदार्थांची पाकिटे आढळून आली आहेत. दरम्यान, कर्जत पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रकार उधळून लावला असून स्वतःची गाडी टाकून पाळल्याने तरुणाकडे नक्की काय होते? याबाबत पोलीस तपास करीत असून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या सुट्ट्या असल्याने पर्यटक फिरायला निघाले असून, कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर गुरुवारी सकाळी साडे अकरा-बारा वाजण्याच्या सुमारास एक पल्सर, एक टीव्हीएस स्कुटी आणि सिटी होंडा कार या तीन गाड्यांचा कोषाने येथे अपघात झाला. त्यावेळी या तिन्ही गाड्यांचे मालक हे एकमेकांशी भांडू लागले.त्यावेळी गर्दी जमू लागल्यावर पल्सर गाडीवरून दोन तरुण पळून गेले. अपघात झाल्याची माहिती मिळताच कर्जत चारफाटा येथे बंदोबस्त करीत असलेले वाहतूक पोलीस तेथे पोहचले. त्यावेळी कर्जत पोलीस ठाण्यातून आणखी काही पोलीस तेथे पोहचले. आणि त्या पोलिसांनी टीव्हीएस स्कुटी गाडीची उघडी असलेली डिकी तपासली असता, गांजा आणि चरस या अमली पदार्थांची काही पाकिटे त्यात आढळून आली. हा प्रकार समोर आल्यावर सिटी होंडा कार चालक याच्या गाडीचे नुकसान झाल्यानंतर कोणतीही भरपाई न मागता तेथून निघून गेला.

तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टीव्हीएस स्कुटी गाडी एम एच ०४ के एन ९३५३ या क्रमांकाच्या गाडीच्या डिकीत अमली पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी गाडीचे हॅण्डल लॉक करून पळून गेलेल्या तरुणाची वाट न बघता एका टेम्पो मध्ये ती स्कुटी भरून पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अमली पदार्थ घेऊन जाणारी गाडी ताब्यात घेता आली आहे. तर दुसरीकडे कर्जत पोलिसांनी अमली पदार्थांचा वापर आपल्या हद्दीतील कोणत्याही फार्म हाऊस, रिसॉर्ट मध्ये होऊ नये यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon